शहरात ईगल,माझा अवैध सुगंधीत तंबाखूची सर्रास विक्री जोमात… — शहरात नव नवीन अवैध तस्कर सक्रिय … — आशीर्वाद कुणाचा ?जनमानसात चर्चेला उधाण ?

 

     उमेश कांबळे 

तालुका प्रतिनिधी भद्रावती 

         सध्या भद्रावती शहरात ईगल,माझा या अवैध सुगंधीत तंबाखूची सर्रास विक्री जोमात सुरु आहे.

        कानकोपऱ्यात आज ज्या खर्रा टपरी वर तंबाखूचा साठा आहे त्यांची टपरी सुरु मात्र ज्यांच्या कड़े तंबाखूचा साठा नाही त्यांची टपरी बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरातील टप्पा या अपघातप्रवन क्षेत्रात प्रवेश द्वारा समोर खर्रा टपरीवर शौकिनाची तोफा गर्दी दिसून येते.

              सदर खर्रा टिपरीवर शौकिनदारांची गर्दी बघितली तर सदर ठिकाणी दूचाकी विक्रीचे दुकान लागलेले असल्याचा भास होतो. 

               नवनवीन अवैध तंबाखू तस्करांच्या मुजोरीने व जागोजागी खर्रा विक्रीने सभ्य नागरिकांना त्रास होऊ लागला आहे.

          भगाराम वार्ड,नवीन उड़ान पुलजवळ, किल्ला वार्ड, मंजूषा ले आउट,अंतर्गत वास्तव्य करणारेच काही व्यक्ती सुगंधित तंबाखुची तस्करी करत असल्याची गमंग चर्चा भद्रावती शहरात आहे.

            सुगंधित तंबाखुची अवैधरित्या तस्करी नेमकी होते तरी कुठून? आणि कोणाच्या आशिर्वादाने? ही साठगांठ आणि मेहरबानी कुणाची?या प्रश्नाने जनमानसांना हैराण केले आहे.