Home Social मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अलंकापुरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अलंकापुरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे 

उपसंपादक 

आळंदी :– महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आळंदी शहर मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन भाजपा आध्यात्मिक आघाडीचे संजय महाराज घुंडरे आणि आळंदी शहर मंडळाच्या अध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

         या वेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, अशोक उमरगेकर, रामभाऊ भोसले, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, ज्ञानेश्वर रायकर, अविनाश बोरुंदिया, मनोहर दिवाने, आकाश जोशी, वासुदेव तुर्की, संकेत वाघमारे, गोविंदा कुऱ्हाडे, प्रितम किर्वे, रुक्मिणीताई कांबळे, मंगलताई हुंडारे, अभिषेक उमरगेकर, शुभम धुर्वे, सचिन सोळंकर, राजेश वहीले यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

          राज्यभरात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून आळंदीत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय घुंडरे पाटील यांनी सांगितले की, “जनताभिमुख काम करणे हे भाजपचे ब्रीदवाक्य आहे. पक्ष माझा स्वाभिमान, पक्ष माझा अभिमान, पक्ष माझा श्वास आणि पक्ष माझा विश्वास या भावनेने कार्यकर्ते कार्यरत असून, अशा सामाजिक उपक्रमांतून पक्षावरचा जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो.”

         मंडल अध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “देवेंद्र फडणवीस हे केवळ यशस्वी मुख्यमंत्री नाहीत, तर कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत हे रक्तदान शिबिर आयोजित केल्याचा आम्हाला आनंद आहे.” या उपक्रमाला आळंदीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.