जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अंथुर्णे नगरीत दाखल.. — आमदार दत्तात्रय भरणे यांनी सहपत्नी केली महाआरती.. — लवकर पाऊस पडू दे आणि माझा बळीराजा सुखी होऊ दे असे साकडे विठुरायाच्या चरणी..

 

निरा नरसिंहपुर दिनांक :21

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

        जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सणसर येथून निघाली व गोल रिंगण बेलवाडी येथे संपन्न झाले त्यानंतर पुढे अंथुर्णे येथे आज मुक्कामी पोहचली.

     यावेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व सारीका भरणे यांनी अंथुर्णे येथे पालखीचे स्वागत केले.आमदार दत्तात्रय भरणे यांनी सपत्नीक महाआरती केली.तसेच ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात वैष्णवांचे आदरातिथ्य केले.

      या पालखी सोहळ्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.पुरषोत्तम मोरे महाराज तसेच सर्व पालखी सोहळा प्रमुख उपस्थित होते.यावेळी आमदार भरणे यांनी विठुरायाच्या चरणी बळीराजाला सुखी समृद्ध होऊ दे लवकर पाऊस पडू दे अशी मागणी केली..

     यावेळी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी झाले असून जगाच्या पाठीवर सर्वात मोठा हा पालखी सोहळा असल्याची प्रचिती येत आहे.तसेच पालखीमध्ये लहान-लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत तसेच हजारो माता भगिनी विठुरायाच्या ओढीने देहभान विसरून चालत आहेत.त्यांच्या निरागस चेह-यावरील आनंद आणि समाधान पाहून आपले मन सुद्धा ख-या अर्थाने प्रफुल्लित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

        तसेच वारीमध्ये चालत असताना वेळवेगळ्या भागातील अनेक वैष्णवांशी संवाद साधण्याचा योग आला असल्याचे आमदार भरणे म्हणाले..