अक्षय तृतीयानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर “बळीराजा पांडुरंग अवतार” चंदन उटी.

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

आळंदी : अक्षय तृतीयनिमित्त आज शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर ‘बळीराजा पांडुरंग अवतार’ ही आकर्षक चंदन उटी साकारण्यात आली. आजची चंदन उटी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसेच स्वकाम सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आली. या वर्षातील ही तिसरी चंदनउटी साकारण्यात आली. गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया आणि नरसिंह जयंती अशा चार वेळा माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटी साकारण्यात येते. 

 

दरम्यान, चंदन उटीनंतर भाविकांना दुरून माउलींचे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. अक्षय तृतीयनिमित्त माऊली मंदिरात आज पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 4 वाजता घंटानाद, नंतर काकडा, पवमान अभिषेक, सायंकाळी 4 वाजता प्रवचन, 5 वाजता कारंजा मंडपात हळदी कुंकु कार्यक्रम, धुपारती आदी कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती देवस्थानचे व्यवस्थाप ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. बळीराजा पांडुरंग अवतार चंदन उटी पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.