Home Maharashtra अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांची आरस….

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांची आरस….

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया या मंगलदिनी पुण्यातील मानाचा नवसाचा श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री.देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. यापूर्वी पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंत गायक अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी 8 वाजता विशेष गणेशयाग आणि रात्री 9 वाजता भजन विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन झाले. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.