मनुष्य जीवनामध्ये भगवंताच्या नामाचा रस सेवन करावा ह भ प दत्ता महाराज कोंडी, सोलापूरकर… — अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प दत्ता महाराज कोंडी सोलापूर यांची झाली..

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे पिरसाहेब बाबांच्या पावन भूमीत सालाबाद प्रमाणे श्री गुरु दत्त जयंती निमित्त ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

           जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान अकरावे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प दत्ता महाराज कोंडी सोलापूर यांची झाली. तर त्याच दिवशी संध्याकाळी भोजन व्यवस्था,अन्नदाते,बबन शंकर बोडके, गोरख शंकर बोडके, व्यंकट शंकर बोडके यांच्या वतीने देण्यात आली. 

           तसेच संपूर्ण सप्ताहासाठी आठ दिवस सकाळी चहाची व्यवस्था आबासाहेब गजानन बोडके यांच्या वतीने देण्यात येत आहे,, तर दररोज सकाळी आठ दिवस अल्पो आहारची व्यवस्था शरद विठ्ठल बोडके यांची असते.आठ दिवस फुल आणि हार व्यवस्था नबेलाल शाबुधीन शेख यांची असते.आठ दिवस शुद्ध पाणी व्यवस्था तेजस एक्वा यांची असते.मंडप स्पीकर व्यवस्था विठ्ठल साऊंड सर्विस गणेशवाडी विठ्ठल गायकवाड यांची आहे.सप्ताहासाठी संपूर्ण आचारी सेवा ह भ प शिंदे बुवा बिजवडी यांची चालु आहे.

       हरिजागर व नामाचा जयघोष करून भरगच्च कार्यक्रमाने सप्ताहाला दुसऱ्या दिवसाची सेवा झाली. सप्ताहासाठी, समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आजी, माजी ,सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व वारकरी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने दररोज येत आहेत.

         आनंदाने महाभोजन घेऊन आनंद घेत आहेत. सर्व भागातील भाविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने नामाचा रस घेण्यासाठी हजारोच्या संख्येने दररोज उपस्थित राहात आहेत.

चौकट

     प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे पिंपरी बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहासाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा करण्यात येत आहे.