आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी डॉ.भावार्थ देखणे,ॲड.राजेंद्र उमाप व योगी निरंजननाथजी यांची निवड… 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

    आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तपदी प्रसिद्ध विधीतज्ञ ॲड.राजेंद्र बाबुराव उमाप, हभप डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे व संत साहित्याचे अभ्यासक योगी निरंजन नाथजी यांची निवड करण्यात आली आहे.

         आषाढी पालखी सोहळा तसेच कार्तिकी एकादशी असे दोन यात्रा आळंदीत लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत भरत आहेत. यासाठी योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी या नवीन विश्वस्त मंडळाची कसरत असणार आहे, येत्या पंधरा दिवसांत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा असून याबाबत सुध्दा जबाबदारी असणार आहे. ॲड.राजेंद्र उमाप यांनी यापूर्वी रांजणगाव गणपती देवस्थान येथे सुध्दा विश्वस्त म्हणून काम केले आहे तसेच नुकतीच त्यांची ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’चे उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

          डॉ.भावार्थ देखणे हे संत साहित्याचे अभ्यासक स्व. डॉ.रामचंद्र देखणे यांचे चिरंजीव आहेत, ते सुद्धा किर्तन, प्रवचन, भारुड यामधून प्रबोधन करत आहेत. तसेच योगी निरंजननाथजी हे सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रातील विचारवंत आहेत. या तीन जनांचा विश्वस्त पदाचा कार्यकाल सात वर्षांचा असणार आहे.