देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने विधान सभेमध्ये रामोशी,बेडर,बेरड, समाजासाठी स्वतंत्र महामंडळाच्या ठरावाला मान्यता मिळाली :- दौलतनाना शितोळे यांचे उद्गार…. — जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून रामोशी बेडर बेरड समाजाला न्याय मिळवून देणार….

नीरा नरसिंहपुर दिनांक :20

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

        पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे जय मल्हार क्रांती संघटनेची सांगता सभा संपन्न झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते जय मल्हार क्रांती संघटनेचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष कल्याण भंडलकर यांनी केले, तसेच यांच्या सह तालुक्यातील व परिसरातील सर्व रामोशी समाज बांधवांच्या वतीने या निमित्त करण्यात आले. संघटना मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंगडी बैठका घेण्यात आल्या गाव तिथे जय मल्हार क्रांती संघटना स्थापन करण्यात आली,सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत जय मल्हार क्रांती संघटनेचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले, संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे उद्घाटन प्रसंगी बोलत आसताना म्हणाले की माझ्या गोर गरीब रामोशी, बेडर, बेरड, राज्यातील सर्व समाजासाठी स्वतंत्र महामंडळाला कायमस्वरूपी मंजुरी देण्यासाठी उफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे विधिमंडळात ठरावाला मंजुरी मिळाली ही आठवण राज्यातील माझा 70 लाख महाराष्ट्रातील गरीब रामोशी समाज कधीही विसरू शकणार नाही.समाजाच्या आर्थिक बजेट योजनेतून तळागाळातील माझा सर्व समाजाला महामंडळाच्या शासकीय सर्व योजना, कर्ज पुरवठा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधाचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार दौलतनाना शितोळे यांचे सांगता सभे निमित्त उद्गार संघटनेचे नवीन संघटक यांना नियुक्ती पत्रही यावेळी देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे,उपाध्यक्ष अंकुशरावजी जाधव, ,सुधीरजी नाईक, रोहिदास मदने, विष्णू चव्हाण, किरणभाऊ खोमणे, सतीशभाऊ माने, बापूराव जाधव,माजी सरपंच आबासो बोडके, चेअरमन निलेश बोडके,सुनील बोडके, सुरेश बोडके, बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी,तसेच तालुका अध्यक्ष कल्याण भंडलकर सहित पिंपरी पंचक्रोशीतील सर्व आजी-माजी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिबीशन घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष कल्याण भंडलकर यांनी मानले.