Home उपक्रम इंदिराबाई बाबारावजी कडू यांच्या स्मृतिपित्यर्थ छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय येथे जागतिक चिमणी...

इंदिराबाई बाबारावजी कडू यांच्या स्मृतिपित्यर्थ छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय येथे जागतिक चिमणी दिवस संपन्न…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे मातोश्री स्वर्गीय इंदिराबाई बाबारावजी कडू यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो.

           या कार्यक्रमामध्ये महाविद्यालय विद्यार्थ्यांना जलपत्राचे वाटप करून पक्षांचे रक्षण कसे करावे व पक्षांसाठी आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर पाण्याची पॉट ठेवून पक्षांचे महत्त्व विशद करण्यात येते. या कार्यक्रमासाठी अमरावती येथिल पर्यावरण तज्ञ ॲडव्होकेट राजमहल निशाने उपस्थित होते.

          एडवोकेट राजमहल निशाने यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणामध्ये चिमणीचे काय योगदान असते व निसर्गचक्रामध्ये चिमणीचे महत्त्व काय यावर पीपीटी च्या साह्याने मार्गदर्शन केले. पर्यावरणामध्ये चिमणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे असे विचार व्यक्त केले. 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र इचे, प्रमुख पाहुणे डॉ.भारत कल्याणकर,डॉ.आशिष काळे, प्रा.अतुल चराटे , सौं मुक्ता निंभोरकर उपस्थित होते. प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रविण सदार तर संचालन प्रा. सागर भुसारी यांनी केली आभार प्रा. अतुल चराटे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.