अवकाळी पावसाचा धानोरा तालुक्याला फटका… — पशु,पक्षी, जनावरे पडले मृत्यूमुखी, गारांचा मारा…

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

         धानोरा तालुक्यामध्ये दिनांक एकूण 19 मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास आलेल्या पावसाने धानोरा तालुक्यातील पिकांना पशु पक्ष्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे.

        तालुक्यामध्ये दूध माळा येथील मनोज शेडमाके यांच्या शेतातील टमाटरचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले.याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची विविध प्रकारची हनी झाली.

       तसेच या गारपिटीने येरंडी येथील भजनराव जगुजी गावडे यांच्या मालकीची गाय चक्रीवादळ पावसासह गारपिटीमुळे  मृत्युमुखी पडली. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशी शेतकऱ्याने मागणी केली.

              तसेच या झालेल्या गारपीटीत दुधमाळा येथील काही पक्षी सुद्धा मरण पावले.तसेच अवकाळी पावसाने व सोबत गारपीटीने दुबार पीक घेणारे शेतकरी व भाजीपाला घेणारे शेतकरी यांच्या पिकाची मोठे नुकसान झाले त्यामुळे ते संकटात सापडले आहेत.

               त्यांचा लवकरात लवकर पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.एकंदरीत या अवकाळी पावसाने व गारपिटीने पीक,पशुपक्षी यांना मोठा फटका बसला आहे.