राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
वरळी डोम येथे २३ फेब्रुवारी रोज सोमवारला माजी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नुकतेच झूम मीटिंग द्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्षांना व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता वरळी डोम येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे.
त्या सभेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील,तसेच राज्य पातळीवरील सर्वच पक्षांचे नेते मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री व इतर सर्व मंत्रीगण,सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने वरळी डोम येथे सोमवार 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे..
याबाबत रविंद्र वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली,यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की अजीतदादा यांना वाहन्यात येणाऱ्या श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.



