चिमूर तालुक्यातंर्गत वाळू व मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्या चोरट्यांनीच अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असे समजायचे काय? — एवढे अनभिज्ञ अधिकारी व कर्मचारी चिमूर तालुक्याला लाभले?..”एक दुर्भाग्य?.. — “विश्वास बसणार नाही,”पण खरबो रुपयांचे अवैध उत्खनन चिमूर तालुक्यातंर्गत होतो आहे..

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

चिमूर :-

            चिमूर तालुक्यातंर्गत वाळू व मुरुमांचे अवैध उत्खनन सर्रासपणे सुरू असताना त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे सातत्याने होणारे अक्षम्य व कमालीचे दुर्लक्ष नागरिकांची झोप उडवणारी आहे.

           वाळू व मूरुमांच्या अवैध उत्खननाकडे जाणिवपूर्वक करण्यात येणारे दुर्लक्ष,चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.

           याचबरोबर अवैध उत्खननाच्या बाबतीत चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची भुमिका ही संदेहास्पद असल्याने त्यांच्याच मुसक्या अवैध उत्खनन करणेवाल्या चोरट्यांनी आवळ्याला काय?अशी शंका आता येवू लागली आहे.

           “होय,”विश्वास बसणार नाही,पण चिमूर तालुक्यातंर्गत खरबो रुपयांचे अवैध उत्खनन करणारी टोळी सक्रिय असून,” सदर टोळी,चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या नजरेत अजिबात येत नाही हेच या तालुक्यातील नागरिकांचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे.

              अवैध उत्खननाद्वारे,” करोडो रुपयांचा महसूल,वाळू व मुरुम चोरट्यांद्वारा बुडविल्या जात असताना संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शांत झोप लागते आहे,याबाबतची नेमके गुपिते काय?हे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा शोधून काढतील काय?हा गहन प्रश्न आहे.

          रस्त्यांची कामे असोत की कुठल्याही प्रकारची कामे असोत मुरुम व वाळूची आवश्यकता असते.या कामांवर मुरुम व वाळू पुरवठा केला जातो आहे.

                याचबरोबर चिमूर तालुक्यातून जिल्हा बाहेर वाळू पुरवठा केली जातो आहे.असे काही वाळू चोर आहेत की बिनधास्तपणे आयवा,ट्रक व टॅक्टरद्वारे वाळूचा पुरवठा पर जिल्ह्यात करताना दिसून येतात.

             चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना, सर्रासपणे वाळू व मूरुमांचे अवैध उत्खनन करणारे चोरटे अजिबात दिसत नाही एवढे अनभिज्ञ ते आहेत याला चिमूर तालुक्याचे दुर्भाग्य समजायचे काय?

           चिमूर तालुक्यातंर्गत एकही वाळू घाट लिलाव नसताना या तालुक्यातंर्गत होणारी वाळूंची चोरी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष द्यायचे का? हे तरी चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी खुल्लमखुल्ला सांगितलेले बरे राहील.