वाघांचे गावाकडील आगमन रोकता येईल काय?

दामोधर रामटेके

कार्यकारी संपादक

         सध्यास्थित वाघाच्या परिभ्रमणाच्या दिशा गावाकडे वळू लागल्याने जंगल व्याप्त क्षेत्रात त्यांचे वावरणे अशक्य झाले की काय? असे वाटू लागले आहे.

        याचबरोबर,वाघ हे ग्रामीण भागातील पाळीव प्राण्यांच्या शोधात फिरत असल्यामुळे ते नेमके कोणत्या गावात शिरकाव करतील याचा नेम नाही.

           चंद्रपूर जिल्हा हा जंगल व्याप्त जिल्हा आहे व जगप्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान सुध्दा याच जिल्ह्यात आहे.

          यामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी राखीव क्षेत्र म्हणून चंद्रपूर जिल्हा जगात ओळखला जातो आहे.

          मात्र,अलिकडच्या काळात चंद्रपूर जिल्हातंर्गत ब्रम्हपुरी,नागभीड,सिंदेवाही,चिमूर,मुल,भद्रावती,पोंभुर्णा व चंद्रपूर तालुक्यात वाघाच्या वावर मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांत असुरक्षितता निर्माण झाली आहे.

          चंद्रपूर जिल्हातंर्गत वाघ नेमका कुठे दिसेल व कुणावर केव्हा हमला करेल याचा नेम नसल्यामुळे जिव धोक्यात टाकून नागरिकांना दैनंदिन कामे करावी लागत आहेत.

          यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना मारण्यासाठी वाघाच्या वावर खुल्लमखुल्ला कुठेही ठेवू नये असी आर्त हाक त्यांना आहे.

         वाघांचे जिव जेवढे महत्वाचे आहे तेवढेच मनुष्यप्राण्यांचे सुध्दा जिव महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

        म्हणूनच मनुष्यप्राण्यांचे रक्षण करण्यासाठी वनविभागाने दक्ष होणे महत्त्वाचे आहे आणि पाळीव प्राण्यांसह नागरिकांना सुरक्षित ठेवणे महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाची जबाबदारी आहे असे गृहीत धरणे अपेक्षित आहे.