शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर :- भारताचे माजी पंतप्रधान, भारतीय संगणक क्रांतीचे जनक व भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त चिमूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमूर येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील,जिल्हा सरचिटणीस तथा माजी सदस्य जि.प. मा.गजानन बुटके,शहर अध्यक्ष अविनाश अगडे,शहर सचिव बाळू बोभाटे,तालुका उपाध्यक्ष राजु चौधरी,पप्पुभाई शेख,मंगेश घ्यार,राकेश साटोणे, श्रीकांत गेडाम,अक्षय लांजेवार, इत्यादी उपस्थित होते.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अर्पण केले आणि त्यांच्या आदर्श कार्याचे स्मरण करून भारताच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.



