विदर्भ स्तरीय लोककला महोत्सव लाखनी येथे भावेश कोटांगले लोक कलावंत पुरस्काराने सन्मानित…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली -विदर्भ स्तरीय लोककलावंताचा मेळावा लाखनी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्याठिकाणी विविध प्रकारच्या लोककलेच सादरीकरण करण्यात आले. व विशेष कार्यात ज्यांचा योगदान आहे अशा कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

   त्यावेळी कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी सतत निवेदन ,आंदोलन करीत असणारे, कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे विभागीय, राज्यस्तरीय जिल्ह्याचे नेतृत्व करणारे , प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष, कवी, गायक, संगीतकार, प्रबोधनकार भावेश कोटांगले यांचा शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

   या सत्कारा प्रसंगी प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे पदाधिकारी, सर्व स्तरीय कलावंत, परिसरातील सर्व जेष्ठ, श्रेष्ठ, आदरणीय मान्यवर, मित्र परिवार यांनी भावेश कोटांगले यांचे फोन,सोशल मीडिया वरून शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.