Home Breaking News ब्रेकिंग न्यूज…  — खल्लार येथिल 19 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

ब्रेकिंग न्यूज…  — खल्लार येथिल 19 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

युवराज डोंगरे 

  उपसंपादक 

       खल्लार येथिल 19 वर्षीय युवकाने अमरावती येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि 20)जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

        हर्षद किशोर तुपसुंदर (19)रा. खल्लार असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून हर्षद हा अमरावती येथिल पी. आर. पोटे कॉलेज ऑफ नर्सिंग मधिल बी एस सी द्वितीय वर्षाला शिकत होता. तो कठोरा रोडवरील रंगोली लॉन मागिल तिरुपती नगर (भाग्यश्री कॉलनी )येथे एखंडे यांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत होता. शनिवारी रात्रीच त्याने खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली. आज (20) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

       हर्षद तुपसुंदर याच्या आत्महत्ये मागिल कारण कळू शकले नाही. हर्षद याच्या पश्चात आई वडील एक बहीण असा आप्त परिवार असून त्याच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात खल्लार येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी बराच जनसमुदाय उपस्थित होता.