व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या तालुका अध्यक्षपदी अतुल कोल्हे यांची निवड… 

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती-

 

         सकारात्मक पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची डिजीटल मिडीया ची चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.

          व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने ही कार्यकारीणी डिजीटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी जाहीर केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत भद्रावती तालुका अध्यक्षपदी लोक लढ्याचा सैनिक अतुल कोल्हे यांची निवड करण्यात आली . या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.