चऱ्होली खुर्द सोसायटीच्या चेअरमन पदी अनिकेत कुऱ्हाडे, व्हा.चेअरमन पदी शारदा थोरवे यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

आळंदी : खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अनिकेत साहेबराव कुऱ्हाडे व व्हा.चेअरमन पदी शारदा पांडुरंग थोरवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

आज निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चेअरमन पदासाठी अनिकेत कुऱ्हाडे व व्हा.चेअरमन पदासाठी शारदा थोरवे यांचेच एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी यांनी चेअरमन पदी अनिकेत कुऱ्हाडे व व्हा.चेअरमन पदी शारदा थोरवे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

यावेळी नवनियुक्त चेअरमन व व्हा चेअरमन यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व नवनिर्वाचित संचालक यांचे अभिनंदन केले.

यावेळी पांडुरंग पगडे, ज्योती थोरवे, शिवाजी थोरवे, राहुल थोरवे, बाळासो थोरवे, योगेश थोरवे, विष्णू थोरवे, कैलास थोरवे, राजकुमार बांगर, अतुल पवार, प्रताप थोरवे, सुभाष जाधव, ऋषीकेश गोडसे त्याच बरोबर सर्व आजी माजी संचालक मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.