Home Maharashtra चोप येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…. — आमदार रामदासजी...

चोप येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…. — आमदार रामदासजी मसराम यांचे मार्गदर्शन…

राजेंद्र रामटेके

विशेष प्रतिनिधी..

         देसाईगंज तालुक्यातील मौजा चोप येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी चोप येथे भेट देऊन कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

             कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मिरवणूक,सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिवचरित्रावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

              गावातील नागरिक,युवक मंडळे,महिला बचत गट व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             आपल्या भाषणात आमदार रामदास मसराम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य,दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा गौरव केला.त्यांच्या विचारांवर चालत समाजात ऐक्य,शिस्त आणि राष्ट्रप्रेम जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.

                तसेच परिसरातील विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.