भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
“गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चातगाव-कारवाफा मार्गावरील पुलाच्या कामाची आज *आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पुलाचे काम अत्यंत संथ गतीने (कासवगतीने) सुरू असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आज ठणकावून सांगितले की, पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून येत्या काही महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाच पाहिजे. तसेच, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पुढील दोन दिवसांत तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्याचे कडक निर्देश प्रशासनाला दिले आहेत. जनतेच्या हिताच्या कामात कसलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.”
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशबारसागडे, जेष्ठ नेते रमेश भुरसे, तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, सिन्नु दुल्लमवार, पवन येरमे, सर्वजणीक बांधकाम विभागाचे धीरज बड्डे, पुरषोत्तम मेश्राम, व स्थानिक नागरिक उपस्थित होते.



