प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
घरी झोपून असताना राजू आनंदराव शिडाम वय ३५ वर्ष यांचा,मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींने धारधार शस्त्राने गळा कापून खून केला असल्याची खळबळजनक घटना पुढे आली.हत्याची घटना कशामुळे घडली हे पोलिस तपासात उघड होईल.
मृतकाच्या घरी आज सकाळी एक इसम गेल्याने,राजू हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे त्याला दिसून आले.त्यांनी सदर हत्येची घटना गावकऱ्यांना सांगितली.
मृतक राजू शिडाम यांच्या घराकडे गावातील नागरिकांनी धाव घेतली व घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली.पोलीसांनी वेळ न दवडता मौजा मोहाळी गाव गाठले व मृतदेहाची पाहणी केली.
पोलिस अधिकाऱ्यांनी व पोलीसांनी मृत्यूदेहाची पहाणी केल्यानंतर जुन्या वैमश्यातून हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवलाय.
राजू शिडाम हा अवैधपणे दारुचा व्यवसाय करीत होता तर मृतकाची मुले शिक्षणासाठी चंद्रपूर जिल्हातंर्गत सिंदेवाही तालुक्यातील मौजा हळदगावला राहात आहेत.
पत्नी चंद्रपूर जिल्हातंर्गत मौजा वरोरा येथील पेट्रोल पंपवर मजूर म्हणून पेट्रोल वितरणाचे काम करीत आहे.मात्र दारुचा अवैध व्यवसाय करणाऱ्या राजू आनंदराव शेडाम यांच्या जवळ त्यांची पत्नी का म्हणून राहात नव्हती?हे कळू शकले नाही.
सदर हत्येची घटना महाराष्ट्र राज्यांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात घडलेली आहे.
हत्याराचा शोध घेण्यासाठी सिंदेवाही पोलिस चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका,ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात व सिंदेवाही ठाणेदार यांच्या नियंत्रणात कसून तपास करीत आहेत.



