ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली:भाजपा साकोली शहर मंडळाच्या वतीने मुख्याधिकारी साकोली/सेंदुरवाफा नगरपरिषद यांना काल दिनांक १८/०७/२०२५ ला निवेदन देण्यात आले.या निवेदनात प्रभाक क्र.६ मधील डॉ.महादेव लेंडे ते श्री देवमन मानकर यांच्या घरापर्यंत असलेला कच्चा रस्ता पक्का करण्यात यावा.
प्रभाग क्रमांक -५ मधील अजितबाबा समाधी चौकातील रस्त्याच्या कडेला असलेला कचरा काढून औषधी व तणनाशक फवारणी करण्यात यावी. स्व.रमाबाई करिये ते श्री चंदु शहारे ते श्री फत्तू राऊत यांच्या घरासमोरून पक्का रस्ता बनविण्यात यावा.उपस्थित असलेल्या विद्युत खांबावर बल्बची व्यवस्था करण्यात यावी.
हे निवेदन देतांना प्रामुख्याने भाजपा जि.सचिव किशोर पोगडे,भाजपा जि.सचिव रवी परशुरामकर,भाजपा साकोली शहर मंडळ अध्यक्ष व्यंकटेश येवले,माजी न.प.उपाध्यक्ष जगन उईके, भाजपा शहर महामंत्री डाकराम कापगते,मेघा बडवाईक,रेणु गणवीर,शैलीनी बांबोर्डे,कविता शहारे,अर्चना इलमे,कैलास पंचबुद्धे,भास्कर येवले,कपिल इंदुरकर,प्रकाश कोडापे,गणेश फाये,रोहित कोडापे,हिना राऊत,भाविका येवले,अरुणा येवले, सुधा फुलबांधे तसेच दोन्ही प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



