कमल विठ्ठल भगत यांचे मरणोत्तर नेत्रदान…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

             स्वावलंबी नगर चंद्रपूर येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल भगत यांच्या पत्नी कमल यांचे आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 ला हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी 10:30 वाजता वयाच्या 65 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

         हेल्पिंग हॅन्ड टीम वन चे मुख्य संयोजक प्रदीप अडकिने यांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचे पती विठ्ठलराव, मूले रवींद्र, जितेंद्र, अभय व स्नूषा, वैशाली, संगीता व शीतल भगत यांनी त्याबाबत संमती दिल्यानंतर शासकीय रुग्णालय चंद्रपूरचे नेत्र चिकित्सा विभागाचे नेत्रदान समन्वयक योगेंद्र इंदुरकर, डॉक्टर सोनाली सातपुते, डॉक्टर मंगर आणि राकेश मेश्राम यांनी मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.

             या प्रक्रियेला डॉक्टर जितेंद्र खोब्रागडे, कुंदन वाघमारे, एन. ए. रायपुरे, घनश्याम जिवतोडे, घनश्याम खनके, तुकाराम झाडे, अशोक नागपुरे, नानाजी पिदुरकर, रामकृष्ण निखाडे सहकार्य केले.

           याप्रसंगी दिलीप होरे, अनंत आत्राम आणि भगत कुटुंबियांतील मयूर, साहिल, सूजल आणि पुर्वा ही मंडळी उपस्थित होती. भगत कुटुंबीयांच्या या निर्णयाचे जनमानसात स्वागत होत आहे.