वाल्हेकरवाडी येथे रक्तदान शिबिरामध्ये ८४ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

पुणे : सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील वाल्हेकरवाडी ब्रांच अंतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन वाल्हेकरवाडी येथे करण्यात आले होते. ज्यामध्ये ८४ निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, निरंकारी भक्तांबरोबर समाजातील अनेक सज्जनांनी सहभाग घेतला. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले यांनी रक्त संकलन करण्याचे कार्य केले.

             शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. दरम्यान वाल्हेकरवाडी विभागातील नगरसेवक ,सामाजिक कार्यकर्ते यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले.