गेवर्धा येथे भव्य प्रोढांचे क्लोज कब्बडी स्पर्धेचे उदघाट्न…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          मानवी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ आवश्यक आहे,खेळाडू नी खेळ खेळत असतानां नव नवीन कौशल्य आत्मसात करून आपल्या चमुला वरिष्ठ स्तरावर नेन्याकरिता जिद्दीने खेळावे असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी गेवर्धा 17 जानेवारीला कोयाराजे क्रिडा मंडळ गेवर्धा यांचे वतीने भव्य प्रोढांचे क्लोज कब्बडी स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी केले.

           विधिवत मैदानचे पूजन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांचे शुभ हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.जीवन नाट हे होते.

   तर प्रमुख अतिथी म्हणुन सौ.सुषमाताई मडावी सरपंच ग्रा.पं. गेवर्धा, श्री.रोशन सय्यद सदस्य , श्रीमती भाग्यरेखाताई वझाडे पो.पाटील, श्री.राजु बारई अध्यक्ष तंटामुक्ती समिती, श्री.हेमंत शिडाम सदस्य .,श्री.बोरकर सर मुख्याध्यापक, श्री.भोला पठाण, श्री.जावेदभाई शेख, श्री.श्रीकांत नागिलवार सि.ए., श्री.सुरेश पुसाम अध्यक्ष ग्रामसभा , श्री.सुधिर बाळबुद्धे सचिव ग्रामसभा गेवर्धा, श्री.राजेंद्र कुमरे अध्यक्ष ग्रामकोष समिती, श्री.मडावी सर, विनायकजी कुथे, मधुकर पा.शेंडे, अनिलभाऊ किन्नाके, डॉ. टेमूर्णे सा., रामाजी ताराम, अहेमद खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील किन्नाके यांनी तर आभार जावेद शेख यांनी केले.