खासदार अशोक नेते यांनी सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथे मंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत केली स्वच्छता….

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी

सिंदेवाही:-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मंदिर स्वच्छतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्याने आपण दिवाळी सारखा सण साजरा करावा.

          प्रत्येकांनी आपल्याला घरोघरी दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा.असा संदेश देत खासदार अशोक नेते यांनी मौजा-लोनवाहीतील श्रीकृष्ण मंदिर ता.सिंदेवाही जि‌.चंद्रपर येथे या श्रीकृष्ण मंदिरात खासदार अशोक नेते यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मंदिर गाभाऱ्याची व परिसराची स्वच्छता केली.