मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याची विधानसभा निवडणूक संपन्न.. — आता निकालाकडे नजरा.. — त्या भुमिका मतदारांनी नाकारल्याचे आले पुढे…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

             मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याची विधानसभा निवडणूक काल संपन्न झाली असून मध्यप्रदेश मध्ये जवळपास ८१ टक्के मतदान झाले तर छत्तीसगड राज्यात ७४ टक्के मतदान झाले आहे.

              मध्यप्रदेश मध्ये विक्रमी मतदान झाल्यामुळे कोणता पक्ष सत्तेवर येईल हे सांगणे कठीण झाले आहे.मात्र या राज्यात बदल घडवून आणण्यासाठी जनता आतूरतेंनी विधानसभा निवडणूकीची वाट बघत होती.

          तद्वतच छत्तीसगड राज्यात काँग्रेस पक्षाला स्वतःच्या बलावर दुसऱ्यांदा सत्तेत येता येणार नाही आणि भाजपालाही सत्ता हस्तगत करता येणार नाही असे तेथील मतदारांचे म्हणणे आहे.

          मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भाजपा,कांग्रेस व बसपा-गोंडवाना गणतंत्र पार्टी मध्ये काट्याची टक्कर असून बहुजन समाज पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीची सामुहिक शक्ती दोन्ही राज्यातंर्गत सत्तेचे समीकरण बदलवणार असल्याचे संकेत देत आहेत.

              बहुजन समाज पार्टी मध्यप्रदेश व छत्तीसगड विधानसभा निवडणूक अंतर्गत यशस्वी होऊ नये यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी प्रश्नातंर्गत एका पत्रकारांशी संवाद साधताना बहन मायावतींच्या विरोधात युट्यूब सोशल मीडियाला बयान देऊन बहनजी बामसेफ शिवाय शक्तीहिन असल्याचे म्हटले होते तर निवडणूक प्रचाराच्या दरम्यान भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे ब्राह्मणांनी पाय धुण्याचा प्रकार केला व हा प्रकार सोशल मीडियावर जोरात फिरविला गेला.

            हे दोन्ही प्रकार बसपाच्या विरोधात जाणार अशा पध्दतीची शक्यता वर्तवली होती.मात्र मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील मतदार एवढे समजदार आणि जाणकार आहेत की त्यांनी बसपा-गोंडवाना गणतंत्र पार्टीला सत्ताधारी बनविण्यासाठी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना भरगच्च मतदान केले.

           येणाऱ्या काळात बसपाला कमजोर करण्यासाठी जे-जे सामाजिक संघटन किंवा इतर संघटन पुढे येतील त्यां संघटनांना देशातील नागरिक नाकारतील असे सुध्दा मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील मतदारांच्या मतमत्तांतरे प्रक्रीया वरुन लक्षात आले आहे.कारण बसपाला कमजोर करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे भाजपा व काँग्रेस पक्षाला पडद्याआड सहकार्य करणे होय,या दोन्ही पक्षांना आलटून पालटून सत्तेवर बसविणे होय,देशातील बहुजन समाजाचे अतोनात नुकसान करणे होय.

              असे असले तरी ३ डिसेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतगणनाकडे मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.