महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतुक करणा-यांवर पोलीसांची पुन्हा कारवाई….

 

ऋषी सहारे

संपादक

         अगामी गणेशोत्सवाच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पल गडचिरोली यांनी संपुर्ण जिल्हयातील पो.स्टे./ उप पो. स्टे/पोमके यांना महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतुक करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

        त्या निर्देशानुसार दिनांक १७/०९/२०२३ रोजी अवैद्यरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे. अशी खबर पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर पो.स्टे देसाईगंज यांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार राऊत, ढोके, सराटे यांनी मिळालेल्या बातमीवरून किदवाई स्कुलचे बाजूचे मोकळया जागेत, देसाईगंज ता. देसाईगंज जि. गडचिरोली येथे उभी असलेली इसम नामे पहलाज प्रभुमल डेंगानी रा. जवाहर वार्ड, देसाईगंज जि. गडचिरोली यांचे ताब्यातील टाटा कंपनीची आल्ट्रोज चारचाकी वाहन क्र. एम एच ३३ व्ही. ७२९० हिचेमधून महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधीत केलेला ५३,९२० /- रूपयाचा प्रतिबंधित ईगंल हुक्का शिशा सुगंधी तंबाखु तसेच सदर वाहन किं. अंदाजे ५,००,०००/- असा एकुण ५,५३,९२० /- रूपयाचा मुददेमाल जप्त करून सदर बाबत अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना माहिती दिली असून त्यांचे 7 फिर्यादीवरून पुढील कारवाई करित आहोत.