Home Political जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध; हरकती...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध; हरकती व सूचना 21 जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन…

ऋषी सहारे 

   संपादक

      गडचिरोली,: ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव यांनी दिनांक 12 जून 2025 रोजी निर्गमित आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 51 जिल्हा परिषद निवडणूक विभाग व 102 पंचायत समिती निर्वाचक गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

         ही प्रारूप प्रभाग रचना दिनांक 14 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसील कार्यालये व सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर तसेच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

         प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप रचनेवर कोणीही हरकत अथवा सूचना असल्यास संबंधित नागरिकांनी त्यांची समर्पक कारणासह लेखी हरकत / सूचना जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे दिनांक 21 जुलै 2025 पर्यंत सादर करावी. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे उप जिल्हाधिकारी (सामान्य) प्रसेनजीत प्रधान यांनी कळविले आहे.