ब्रेकिंग न्युज…. वाघाच्या हल्ल्यात महिला ठार – वनमंत्री साहेब आता तरी लक्ष दया…! — सावली तालुक्यातील खळबळजणक घटणा..

सावली :-(सुधाकर दुधे)

        सावली पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चकवीरखल येथील मंदा एकनाथ सिडाम वय ५३वर्ष ही रात्रोच्या सुमारास घराच्या अंगणात खाटेवर झोपली असताना नरभक्षक वाघाने रात्री १ ते २ च्या सुमारास खाटेवरून उचलून नेवुन नरडीचा घोट घेतल्याने महीलेचा मृत झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून गावात राहायचं की जंगलात असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सावली वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील क्षेत्र असून या परिसरात वाघ व बिबट यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जनमानसात वनविभागाबाबत प्रचंड आक्रोश निर्माण होत आहे. आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एकूण ५३ जणांचा बळी गेला असुन एकट्या सावली तालुक्यात हा २० वा बळी आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता एक तृतीयांश पेक्षा जास्त बळी एका सावली तालुक्यात गेलेले आहेत, ही गांभीर्याची बाब आहे मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मागील आठवड्यात बोरमाळा येथील पाच वर्षीय हर्षल चा वाघाने बळी घेतलेला होता.

वाघाच्या हल्ल्यात वाघाने किती बळी घेतल्यानंतर शासन व प्रशासन उपायोजना करणार ? . 

मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता आणि जनतेचा वनविभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सावली वन परिक्षेत्रात अनेक साहित्याचा अभाव आहे त्याची पूर्तता करण्यात यावी यासाठी सावली वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांना नुकतेच निवेदन सादर केलेले आहे, परंतु याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.