चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखनी : येथील श्री. विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र, लाखनी यांच्या वतीने परमपूज्य सद्गुरु सतगुरुवास स्वामी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरूदास महाराज यांचे निजानंदगमन दासनवमी, बुधवार दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी झाले होते.
त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा भावांजली कार्यक्रम श्री. गणेशदत्त राधाकृष्ण मंदिर, दत्तनगर, प्रभाग क्र. १२, लाखनी येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. चारूदत्त आफळे (पुणे) यांच्या अध्यक्षस्थानी व अजय देशमुख (नागपूर) यांच्या उपस्थितीत भावांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला असून, परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रा अरुण कडबे (केंद्रप्रमुख) यांनी केले आहे. तसेच सर्व उपासक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

