गोंडवाना विद्यापीठस्तरीय क्रिकेट सामन्यात जेएसपीएम महाविद्यालय अंतिम सामन्यात विजयी…

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिकेट स्पर्धा चंद्रपूर झोन व गडचिरोली झोन अशा दोन गटात विभागण्यात आली होती.

         गोंडवाना विद्यापीठ स्तरीय क्रिकेट चषकामध्ये गडचिरोली झोन मधून अंतिम सामन्यात श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जे एस पी एम महाविद्यालय धानोरा यांनी आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यांना पराभूत करून गडचिरोली झोन मधील सेमी फायनल सामन्यात विजय करून अंतिम सामन्यात प्रवेश केला,तर चंद्रपूर झोन मधून गुरुनानक महाविद्यालय बल्लारशा यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला.

            दिनांक 17/03/24 ला कर्मवीर महाविद्यालय मुल येथील क्रीडांगणावर गोंडवाना विद्यापीठ स्तरीय क्रिकेट चषकाचा अंतिम सामना घेण्यात आला.

         याप्रसंगी दोन्ही झोनमधील अंतिम सामन्यात प्रवेश केलेल्या दोन्ही संघात अंतिम सामना विजयी होण्याची उत्कंठा निर्माण झाली. गोंडवाना विद्यापीठ चषक प्राप्त करण्याची उत्कंठा निर्माण झाली व अंतिम सामन्यांमध्ये गुरुनानक महाविद्यालयाचा श्री जेएसपीएम महाविद्यालय धानोरा यांनी 57धावांनी पराभव केला अंतिम सामना अतिशय रोमांचक सामना झाला. एकूण 112 धावा जेएसपीएम महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आल्या.

           57 धावांनी जे एस पी एम महाविद्यालयाने विजय प्राप्त केला व गोंडवाना विद्यापीठ स्तरीय क्रिकेट चषक प्राप्त करून घेतला व जे एस पी एम महाविद्यालयाचे अष्टपैलू फलंदाज प्रा. प्रशांत वाळके यांनी नॉट आउट 67 धावा संघासाठी काढल्या त्यांच्या या विजयांमध्ये मोलाचा वाटा राहिला.

          जेएसपीएम महाविद्यालय धानोराने गुरुनानक महाविद्यालय बल्लारपुर त्यांनी केवळ 56 धावसंख्या काढल्यात.  या विजयामध्ये कर्णधार डॉ पंकज चव्हाण ,प्रा नितेश पुण्यपप्रेड्डीवार,चापले सर,मलोडे सर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली त्याने प्राप्त केलेल्या या विजयाबद्दल श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष शालिनीताई मुनघाटे कार्याध्यक्ष श्रीमती आशीताई रोहनकर तसेच सचिव श्रीमती. मीनलताई सहानी सहसचिव सौरभ दादा मूनघाटे व सर्व संस्था पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद या सर्वांनी विजयी संघाचे अभिनंदन व कौतुक केलेले आहे…