पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर लोकांचे परप्रांतात स्थलांतरण.. — आदिवासी जिल्ह्यात मजूरांच्या कामेच नाहीत.

अनिलकुमार एन.ठवरे

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

        दखल न्युज भारत

देलनवाडी :- शेतीचे कामे निस्तारलेली आहेत.सध्याच्या स्थितीत गावात व परिसरात हाताला काम नाही आणि पोट भरण्याचे दुसरे साधन नाही. 

         अशा अवस्थेत आता काय करावे?अशा विवंचनेत असलेला मजूर-किसान वर्ग काळजावर दगड ठेऊन आपल्या परिवाराला व चिमुकल्यांना घरी ठेवून दुसऱ्या राज्यात दूरवर मजूरी करण्यासाठी जाण्यास नाईलाजाने तयार होतो.

         गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात हाताला कामे नसल्यामुळे पोटाची भूक भागवायची कशी?असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर दरवर्षी उभा असतो.

          जिल्ह्यात उद्योग धंद्याची कमतरता आहे.परराज्यात मजूरी करण्यासाठी जाताना मजबूर मजूर नागरिकांना आपल्या परिवारापासून पाणावलेल्या डोळ्यांनी दूर होताना पाहून हृदय भरून आल्या शिवाय राहत नाही एवढे मात्र सत्य आहे.

          याला कारणीभूत कोण? असा प्रश्न या निमित्याने प्रत्येक जनमानसाला पडल्याशिवाय राहत नाही.