Home Maharashtra हरवलेले मोबाईल,१०५ नागरिकांना दिले दिवाळीपूर्वीच परत…. — आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी दिले...

हरवलेले मोबाईल,१०५ नागरिकांना दिले दिवाळीपूर्वीच परत…. — आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी दिले ‘बंपर गिफ्ट’…

अबोदनागो एस.चव्हाण… 

जिल्हा प्रतिनिधी अमरावती 

        दखल न्युज भारत…

अमरावती :- मोबाईल हरवल्यानंतर ते परत मिळण्याचे स्वप्न बहुतेक वेळा धुरीस वाटते.पण अमरावती सायबर पोलिसांनी हे अशक्य ते शक्य करून दाखवले. 

        आधुनिक तंत्रज्ञान आणि सूक्ष्म तपासणीचा वापर करून सायबर पोलिसांनी १०५ हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या खऱ्या मालकांना परत केले.

          दिवाळीच्या शुभ प्रसंगी दिलेल्या या ‘मोबाईल गिफ्ट’ मुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची झलक स्पष्ट दिसत होती.हा कार्यक्रम अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला,जिथे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी मोबाईल परत केले. 

       या प्रसंगी डीसीपी श्याम घुगे,डीसीपी गणेश शिंदे आणि डीसीपी रमेश धुमाळ उपस्थित होते.

       सेंटर इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टल ने महत्त्वाची भूमिका बजावली.सायबर पोलिसांनी मोबाईल स्वतः रिकव्हर केले,तर काही मोबाईल पोर्टलच्या माध्यमातून शोधले.

        याशिवाय,बडनेरा पोलिस स्टेशनने १४ हरवलेले मोबाईल परत मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली.

        कार्यक्रमादरम्यान,आयुक्त अरविंद चावरियांनी सायबर ठाण्याचे पीआय महेंद्र अंभोरे,एपीआय अनिकेत कासार,एपीआय प्रियंका कोटावार आणि बडनेरा थानेचे प्रभारी सुनिल चव्हाण यांना प्रशंसा आणि शुभेच्छा दिल्या.

       आयुक्तांनी सांगितले, “मोबाईल हे फक्त एक उपकरण नाही, तर प्रत्येकाच्या वैयक्तिक माहिती आणि आठवणींचा संग्रह आहे. 

       मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांसाठी हा आनंदाचा मोठा क्षण आहे.पोलीसांचा हा मानवीय चेहरा जनतेच्या विश्वासाला अधिक मजबूत करतो.”

       सायबर पोलिसांच्या या पुढाकाराचे नागरिकांनीही कौतुक केले आणि त्यास ‘दिवाळीचा सर्वात मोठे बक्षिस ’ म्हणून संबोधले.