“पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही जागतिक महायुद्धाला जर्मनीच कारणीभूत ठरलेला आहे. औद्योगिक क्रांतिनंतर जागतिक शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झाली. परिणामी जागतिक साम्राज्यवादाला सुरुवात झाली. याच काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच जर्मनीत पहिला सम्राट कैसर विल्यम हा सर्वसत्ताधीश होता. त्यानेच अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रांस, इटली, अशा प्रमुख शस्त्रास्त्र स्पर्धेत उतरलेल्या राष्ट्रांच्या मनात एकमेकांविषयी शंकेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करून जागतिक संभ्रम निर्माण करून अशांतता पसरवली आणि परिणामी पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. या युद्धात जर्मनीचे जेंव्हा मध्येच खच्चीकरण झाले. तेंव्हा हाच कैसर विल्यम देश सोडून पळाला. याचे शल्य सैन्यात सैनिकांना निरोप पोहचविणाऱ्या एक राष्ट्रभक्त सैनिक असलेल्या ” हिटलरला ” सहन झाले नाही. तो आपल्या देशाच्या पराभवानंतर आणि विशेष म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर झालेल्या व्हर्सायच्या तहात जर्मनीच्या अपमानाचा सुड उगविण्याची खूणगाठ हिटलरने मनात बांधली. त्याच्या आईवर यहूदींनी केलेल्या छळाचा परिणाम त्याच्या बालमनावर होताच. म्हणून यहूदीविषयी आणि दोस्त राष्ट्राविषयीची संतापाची लाट त्याच्या मनात घर करत गेली.
त्याचेच दुष्परिणाम पुढे दुसऱ्या महायुद्धात जगाला ढकलण्याचे काम एकट्या हिटलरने केले. म्हणून दोन्ही जागतिक महायुद्धाला जर्मनीच कारणीभूत ठरलेला आहे.
1939 ते 1945 पर्यंत झालेल्या युद्धाच्या इतिहासात मी जाणार नाही. मात्र RSS आणि हिटलर ही दोघेही एकाच ध्येयाने पछाडलेली आहेत. फरक इथे एवढाच आहे की इथे हा एकटा होता आणि इथे ही संघटना आहे…….!
परंतू , इथे एकट्या हिटलरने संपूर्ण जगाला आपल्या पायाखाली लोळविण्याची मनीषा उराशी घेऊन लढत होता. तर इथे हीच RSS संपूर्ण जगाला आपल्या कुसांस्कृतिक गुलामीत जगाला टाकण्यास सुरुवात केलेली आहे. जीने प्रथम भारतात गेल्या 100 वर्षांपासून सुरुवात केलेली आहे.
निसर्गवादाच्या, मानवतेच्या, संपूर्ण सजीवसृष्टीच्या विरोधात आपली ” कुसंस्कृती अर्थात मनुस्मृतीवर आधारलेली कुटनीतीची मनुवादी विचारसरणी ” निर्माण करून सर्व जगाला गुलाम बनविण्याचे या RSS चे स्वप्न कधी पूर्ण झाले नाही, कधीच पूर्ण होणार सुद्धा नाहीत. हे इतिहासावरून सिद्ध झाले आहे…..!
परंतू , ते सर्व शक्तिनीशी काम करतात, आपणही त्यांच्या षडयंत्राच्या अमिषाला बळी न पडता वेळीच कावा ओळखून तसेच त्यांच्यासोबत दुर्व्यवहार केले पाहिजेत. आजपर्यंतच्या महापुरुषांनी तथागत भगवान बुद्ध आणि सॉक्रेटीस, तसेच छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा वैचारिक क्रांतिकारकांनी हेच केले म्हणून तर तीला संपूर्ण भारत गिळंकृत करण्यात अडचणी येत आहेत……!
हिटलरने आपला मंत्री हेनरीच हीमलरवर एक जबाबदारी सोपवली होती, की जिथे कुठे यहूदी असतील तिथून त्यांना आणून ठार मारण्याचे आदेश या हिमलरला हिटलरने दिले होते. प्रत्यक्षात हिटलर आणि हिमलर यांनी कधीच यहूदींना मारताना प्रत्यक्ष कधीच पाहिले नाही.
परंतू , हेनरीच हिमलरने मात्र ही कामगीरी आपला विश्वासू ऍडोल्फ ऍशमन याच्यावर सोपवली होती. या ऍशमनने एकट्याने मृत्यूच्या चेंबरमध्ये संपूर्ण 5 वर्षात जवळपास 60 लाख यहूदींना ठार केले होते. त्या चेंबरमध्ये मोठ्या खड्ड्यात निरापराध बायका, मुलं, म्हातारी माणसांना टाकून वरून रणगाडा फिरवत असे. तो रणगाडा रक्ताच्या चिळकांड्यांनी माखत असे…….!
जिवंत तरुण, तरुणीच्या बेशुद्ध न करताच त्यांची अवयव किडनी, हृदय कापून घेत असत…..!
युद्धसमाप्तीनंतर तिथे साढेतीन हजार किलो माणसांची केसं सापडली होती…….!
15 टन चप्पल, बूट सापडले होती…….!
जेंव्हा हिटलरच्या आत्महत्येनी दुसरे महायुद्ध संपले. रशियाने जर्मनीवर, बर्लीनवर ताबा मिळविला. जर्मनीचा पूर्ण पाडाव झाला.
त्यानंतर ज्याने 60 लाख यहूदींना प्रत्यक्ष ठार केले होते……
तो ऍडोल्फ ऍशमन 16 वर्षे भूमिगत राहिला. सोळा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर इस्राएलला तो सापडला….!
त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तत्पूर्वी त्याला न्यायमूर्तिनी एकच प्रश्न केला…..
” एवढ्या हत्त्या करताना तुला सर्वशक्तिमान असलेल्या परमेश्वराची भीती वाटली नाही का….? “
त्यावर त्याचे उत्तर फारच मार्मिक होते……
तो म्हणाला, ” तो जर सर्वशक्तिमान असता तर, त्याने मला हे कृत्य करू दिले असते का….?
या उत्तराने संपूर्ण न्यायालय क्षणभर स्तब्ध झाले होते…..!!!!
त्याने पुढे सांगितले की, मी तर केवळ वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत होतो. उलट 60 लाख ज्यूच्या हत्येमुळे मला स्वर्गीय सुख लाभणार आहे. ते समाधान सोबत घेऊन मी थडग्यात प्रवेश करणार आहे. म्हणून मला फासावर जाताना दुःख होणार नाही….!
जर अणुबॉम्बचा शोध जर्मनीच्या शास्त्रज्ञानी अमेरिकेच्या अगोदर लावला असता…..
तर दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच जगाचा सर्वसत्ताधीश……..
आर्यवंशीय ऍडोल्फ हिटलर ( जर्मनीचा नव्हे तर जगाचा सर्वेसर्वा ) ठरला असता……!
याच हिटलरच्या वैचारिक औलाद असलेली…..
आर्यवंशीय RSS यांच्या ध्येयात, यांच्या उद्देशात 100% साम्य आहे.
याच RSS ने हिटलरच्या नाझी पक्षाचा…….
उलटा स्वस्तिक बोधचिन्ह म्हणून स्वीकारले आहे……!
हिटलरने जसे लोकशाहीचे प्रतीक म्हणून कोंबड्यांची पीसे उपटून काढत असे…….
इथे RSS लोकशाहीतील विरोधीपक्षांचे पंख छाटण्यात आसुरीआनंद घेते…..!
हिटलर जनतेला चेंबरमध्ये टाकत असे. तर RSS जनतेला जगता – जगता मरण्याच्या आणि मरता – मरता जगण्याच्या दयनीय अवस्थेत टाकून आत्महत्या करावयास भाग पाडत आहे.
RSS ने मोहन भागवत, मोदी, शहा, नड्डा आणि फसणवीस या चांडाळ चौकडीच्या माध्यमातून संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्रात साम, दाम, दंड आणि भेदाच्या कुटनीतीच्या बळावर नवनवीन…….
षडयंत्र वापरून, सामान्य जनतेला सत्ता आणि पैश्याच्या बळावर हतबल करून गुलाम बनवले…….
एकेकाळी पॅन्थर असणारे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, ऱा. सू. गवई या सारख्या दिग्गजांच्या तोंडात हाडूक चघळायला देऊन शेपूट हलवत आनंदाने RSS चे बटीक होऊन गळ्यात भाजपचा पट्टा चढवून मालकाच्या घरी कुत्र कारभारी अशी अवस्था या नालायक औलादीनी केली. यांना ना तथागत भगवान बुद्धाच्या धम्माशी घेणे देणे……
ना भीमक्रांतीशी घेणे देणे……
ना संविधानाशी घेणे देणे…….
या नाजायाज औलादीला केवळ सत्ता, पैसा, पद, प्रतिष्ठा यांच्याऐवजी काहीही कळणार नाही.
देशात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पंचायत राज्य व्यवस्थेच्या पाच वर्षांपासून निवडणुका होऊ शकल्या नाहीत. याचा साधा जाब विचारण्याची आमची हिम्मत का होत नाही……?
केवळ गौतम अदानी, अंबानी सारख्यांसाठीच भारताला प्रायव्हेट लिमिटेड करू द्यायचा का…?
जगाच्या पोशिंद्याचा आंदोलनात स्वतंत्र भारतात साढेसातशेच्यावर बळी जातो. मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा मोदींविरुद्ध नोंद होत नाही……!
800 दिवसापासून मणिपूर जळते, तेथील आग थंड झाल्यावर, राख विझल्यावर राष्ट्रपती राजवट लावल्या जाते…….!
मानवी हक्काचे सर्रास उल्लंघन दररोज चालू आहे…..!
लडाखला सहाव्या अनुसूचित टाकण्याचा शब्द देऊन सुद्धा मोदी/ शहा यांनी लडाखला 2019 पासून झुलवत ठेवले म्हणून ” सोनम वांगचूक ” यांनी आंदोलन छेडले. तर एक शिक्षणप्रेमी, तंत्रज्ञ, पर्यावरणवादी, अर्थात निसर्गवादी असलेल्या क्रांतिकारक ” सोनम वांगचूक यांनाच तुरुंगात टाकण्याची मोदी, शहाला जागतिक नामुष्की ओढवून घ्यावी लागली…..!
तथागत भगवान बुद्धाच्या धम्माच्या तत्वज्ञानातून निर्माण झालेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांवरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान निर्माण केले. त्याच संविधानातून निर्माण झालेले व संविधान आणि आम्ही भारताच्या लोकांचे रक्षण करण्याचे संविधानिक कार्य हे सर्वोच्च न्यायालयाचे आहे. आणि या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद म्हणजे…….
भारताच्या सर्वोच्च न्यायसंस्थेचे ते केवळ पदच नव्हे तर जगात ती आमची गरिमा आहे. ते आमच्या देशाच्या लोकशाहीचे…..
भारतीय लोकशाहीचे स्वाभिमानी नाक आहे.
अशा पदाला बूट उगारण्याचा प्रयत्न जेंव्हा RSS च्या पाठबळाने एक वकील करतो. तेंव्हा जगाच्या भुवया उंचावतात…….!
मग इथे…….
वॉशिंगटन पोस्टला भारताच्या भविष्याचा सदरील लेख लिहावा लागतोय…..!
त्यासाठी हँड देशात RSS च्या षडयंत्राला बळी पडलेल्या संविधानवादी बहुजन, ओबीसी, सुशिक्षित युवा पिढीनो आता तरी या मानसिक गुलामीतून जागे व्हा…..!
कर्तव्यातून सिद्ध व्हा…..
या RSS वादी, मोहन भागवत, मोदी, शहा, नड्डा, फडणवीस आणि यांची राजकीय मित्रपक्षांची पिलावळ विविध क्षेत्रात पराभूत करण्याचे कर्तव्य आपले आहे.
जोपर्यंत ही EVM आहे तोपर्यंत या RSS या सत्तेत असणार आहे. आता 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या EVM ला कायमचे हटविण्यासाठी देशात एक फ्रेंच राज्यक्रांती आम्हाला घडवावीच लागेल…….!
जसे…….
हिटलरला वरचढ अमेरिका ठरली आणि तीने अणुबॉम्ब बनवून हिटलरची दहशत कायमची संपऊन त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले…..
इथे RSS ला सुद्धा……
आम्ही भारताचे लोकं..
या छत्राखाली येऊन कायमचे संपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानाच्या मदतीने शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करून तीला कायमचे मातीत गाडूया….
त्यासाठी केवळ आणि केवळ तथागत भगवान बुद्धाचा सदधम्म आणि बाबासाहेबांचे संविधान याच आधाराने या RSS चा पराभव आपण करू शकतो……….
कोणत्याही नकली, स्वार्थाने बरबटलेल्या, चारित्र्यहीन डॉक्टरेट, प्राध्यापक, षंढ बुद्धीजीवी वर्गांवर अवलंबून न राहता, स्वतःच्या मनगटाच्या बळावर बौद्धिक कौशल्याने, शीलाच्या बळावर निःस्वार्थपणे…….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर….
यांनी एकट्यांनी ओढत आणलेला संविधान रथ आणि समाज रथ मागे न येऊ देता, पुढेच घेऊन जाण्याचा आपण सर्वजन प्रयत्न करू…..
मी तर करणार…..
तुम्ही……?


