Home Social मुख्याध्यापिका सौ.प्रियंका काळे यांना कार्यमुक्त, राजनीकुंड शाळेत निरोप समारंभ उत्साहात… —...

मुख्याध्यापिका सौ.प्रियंका काळे यांना कार्यमुक्त, राजनीकुंड शाळेत निरोप समारंभ उत्साहात… — गुरुदेव नगर तिवसा येथे बदली,अल्प कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

        दखल न्युज भारत

 दि.15 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजनीकुंड येथील मुख्याध्यापिका सौ.प्रियंका मनीष काळे यांना त्यांच्या गुरुदेव नगर, तिवसा येथील बदलीमुळे कार्यमुक्त करण्यात आले. या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

              कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री मोहनभाऊ मुंडे, अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती (SMC) यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून काटकुंभ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अमोदे सर, श्री अशोकभाऊ अलोकार (सदस्य, ग्रामपंचायत), श्री नरेश सर, तसेच नवनियुक्त मुख्याध्यापक श्री सुनील झाडखंडे सर उपस्थित होते.

         कार्यक्रमात बोलताना श्री. अमोदे सर म्हणाले की, “सौ. काळे मॅडम यांनी अत्यल्प कालावधीत शाळेचा विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांची निष्ठा, परिश्रम आणि नेतृत्वशैली आदर्शवत आहे.”

        सौ.काळे यांनी आपल्या कार्यकाळात शाळेसाठी 1000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, मोटर पंप, ग्रीन नेट, तसेच इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

        या प्रसंगी श्री अमोदे सर, श्री नरेश सर, तसेच श्री सुनील झाडखंडे सर यांचा सत्कार सौ.काळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

         कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा प्रशिक्षणार्थी श्री अजय मुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

         सौ.काळे मॅडम यांच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांनीही आपली भावना व्यक्त केली. “मॅडम नेहमी आम्हाला प्रोत्साहन देत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाण्याची प्रेरणा देत असत,” असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

        कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी मॅडम यांना त्यांच्या नव्या कार्यस्थळी यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.