Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — लोतवाडा ते कुटासा-मुंडगाव शेत रस्त्यांचे काम होणार प्रशासनाचे आश्वासन…...

ब्रेकिंग न्यूज… — लोतवाडा ते कुटासा-मुंडगाव शेत रस्त्यांचे काम होणार प्रशासनाचे आश्वासन… — जलत्याग आमरण उपोषण मागे…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक 

        दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथिल शेतकरी भिमराव कुऱ्हाडे यांनी मंगळवार (दि.16) पासून लोतवाडा ते कुटासा-मुंडगाव शेतरस्त्यासाठी जलत्याग व आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

             दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दर्यापूरचे तहसिलदार डॉ.रविंद्रकुमार कानडजे, गटविकास अधिकारी चंदू ढवक,नायब तहसिलदार प्रमोद काळे आदींनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्ते भिमराव कुऱ्हाडे यांच्याशी चर्चा करून लेखी आश्वासन दिले. व लिंबू सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले. 

             सदर शेत रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने शेत रस्ता अरुंद झाला असून त्याचे मोजमाप करुन हद्द कायम करुन तो मोकळा करण्यासाठी भिमराव कुऱ्हाडे यांनी शेत रस्त्यावर ट्रॅक्टरमध्ये जलत्याग आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

               अखेर उपोषण मागे घेण्यासाठी पाऊस थांबताच लवकरच मोजणी व अतिक्रमण मोकळे करण रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले आहे.