Home देशविदेश धानोरा व सालेभाट्टी च्या रोडवर पडलेल्या खड्यात फसले दोन ट्रक…  —...

धानोरा व सालेभाट्टी च्या रोडवर पडलेल्या खड्यात फसले दोन ट्रक…  — ट्रक फासण्याचा सिलसिला सुरू,वाहतूक तीन दिवसा पासून बंद…   — धानोरा मुरूमगाव बस १५ दिवसापासून बंद,शालेय विद्यार्थ्यांना फटका,राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्याचे दुर्लक्ष… 

भाविकदास करमनकर

तालुका प्रतिनिधी धानोरा…

       दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी धानोरा ते छत्तीसगड या राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास दोन ट्रक सालेभट्टी या गावाजवळील पडलेल्या खड्ड्यामध्ये,(सी.जी.१०, बिपी ३०११ व सी.जी.१०,एनझेड ८६४० या क्रमांकचे) दोन ट्रक फसले असल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक १३ सप्टेंबर पासून पूर्णपणे ठप्प पडली आहे.

       त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.गडचिरोली ते मुरूमगाव जाणारी एसटी महामंडळाची बस पंधरा दिवसापासून बंद आहे.

             यामुळे याचा सर्वात जास्त फटका शालेय विद्यार्थ्यांना,सामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आपले काम करण्यासाठी त्रास होत आहे.धानोरा ते मुरूमगाव छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 या रोडवर सालेभट्टी पासून ते जपतलाईपर्यंत या सात किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.

      यामुळे वाहनांना आपले वाहन काढत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या रस्त्यावर तीन ते चार फूट खोल खड्डे पडले होते.त्यामध्ये 2 सप्टेंबरला दोन ट्रक ढवळी या गावाजवळ फसले होते.त्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प पडली होती.

            दिवसभरामध्ये तो फसलेला ट्रक काढून त्या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता सुरू करण्यात आला होता.परंतु चार 4 सप्टेंबर रोजी पुन्हा सालेभट्टीच्या समोर पडलेल्या खड्ड्यात दोन ट्रक फसले असल्याने १३ सप्टेंबर पासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे.

       चार चाकी वाहनांना तसेच दुचाकी वाहनांना सुद्धा आपले वाहन काढताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने काढावे हा प्रश्न चालका समोर आव्हानात्मक आहे.

        हा मार्ग छत्तीसगड राज्याला जोडणारा असल्यामुळे सुरजागड ते छत्तीसगड ला जाणारे अवजड वाहन याच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 धानोरा वरून छत्तीसगडला जात असतात.या अवजड वाहनामुळे धानोरा सालेभट्टी ते जपतलाईपर्यंत च्या डांबरीकरणाचा अक्षरशः चुराडा झालेला आहे.

             त्यामुळे रस्ता अक्षरशः चिखलमय झाला आहे.त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी दोन ट्रक फसले असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे.काल फसलेले दोन ट्रक निघाले,काही वेळ वाहतूक सुरु झाली होती. 

      परत रात्रौलाच एम.एच.३२, एजे.५६९२ क्रमांकचा लाकडानी भरलेला ट्रक धानोरा वरून छत्तीसगड कडे जाताना काल ट्रक फसलेल्या ठिकाणी,रात्रौला दुसरा ट्रक फसला असून परत वाहतूक पुन्हा बंद झाली आहे.

          वाहणाच्या सहा किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहे.धानोरा छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक फसण्याचा सिलसिला सुरू आहे.फसलेले ट्रक काढून व त्या ठिकाणी मुरूम टाकून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.