शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
सावरी ते बोथली व सावरी ते खापरी रस्त्याला रस्ता क्रमांक देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांच्या द्वारे आत्मदहन आंदोलन करण्यात आले होते…
सावरी ते बोथली व सावरी ते खापरी या रस्त्यासाठी शेतकरी,विद्यार्थी,मजुर,व्यापारी,डॉक्टर आदी गेल्या १३ वर्षांपासून रस्ता क्रमांकची मागणी करत आहेत.
परंतु मागणी पुर्ण होत नसल्याने स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्यांनी व भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका संघटनाच्या वतीने पुढाकार घेत आत्मदहन आंदोलन उभारण्यात आले.
यावेळी आंदोलन ठिकाणी संतप्त झालेल्या आंदोलन कर्त्यांनी सांगितले की,स्थानिक लोकप्रतिनिधींना लक्ष केंद्रित करून रस्ता क्रंमाकची मागणी पुर्ण करावी अशी स्पष्ट भूमिका मागणी आंदोलन कर्त्यांनी केली.
आंदोलन कर्त्यांनी सांगितले की याच रस्त्याचे बांधकामांचे उद्घाटन माजी खासदार अशोक नेते यांनी केले आणि ते उद्घाटन खोटे ठरले.त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनांच्या दरम्यान अशोक नेते यांचा निषेध सुध्दा केला.
महाराष्ट्रातंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील १२०० हुन अधिक रस्ता क्रंमाकचे प्रस्ताव मंत्रालयात तसेच पडले आहेत.त्यामुळे नारे बाजी करत,”लाल टमाटर शिखरावर मंत्रालय बसले डुकरावर,अश्या खोड्याळ शब्दात मंत्रालयावर टिपणी करत नारेबाजी करण्यात आली.
स्वातंत्र्य दिन असल्याने शासनाचे वरिष्ठ प्रशासन अधिकारी या विषयाला अनुसरून गांभिर्याने लक्ष वेधून बसले होते.पंरतु प्रशासनाच्या वतीने आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार चिमूर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित होत निवेदन स्वीकारले.
त्यामध्ये निवेदनात केलेल्या मागण्या नक्की पुर्ण करण्याची कारवाई तहसील कार्यालय चिमुरच्या वतीने करण्यात येणार अशी हमी सुध्दा नायब तहसीलदार चिमूर यांनी आंदोलनस्थळी दिली.
या आंदोलन ठिकाणी रामदास खामनकर सावरी ग्रामपंचायत सदस्य हे आंदोलनात सहभागी होते.त्यावेळी तेही पाण्यात समाधी घेत असल्याचे त्यांच्याकडुन बोलले जात होते.पंरतु परिस्थिती हालवल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते.
रस्ता मागणी पुर्ण करण्यात आली नाही तर भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका कार्याध्यक्ष जगदीश मेश्राम यांची महाराष्ट्र मंत्रालयात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत होते.



