लक्षवेधी
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
आमदारांना पक्ष कार्यालयासाठी निधी मिळतोय.यामुळे कुठल्याही आमदारांनी शासकीय गाड्यात पक्षाचे जनसंपर्क कार्यालय थाटने अनुचित आहे,हे लक्षात घेतले तर आमदारांचे कर्तव्य कायद्याचे पालन करणारे असायला पाहिजे.
तद्वतच सत्ता,पद,हे विकासकामांसाठी व जनसेवा करण्यासाठी असतात.म्हणूनच आमदार सारख्या व्यक्तींनी शासकीय गाड्यात जनसंपर्क कार्यालय थाटने हे शिस्तीचे उल्लंघन करणारे आहे आणि पदाच्या आड माणुसकी हिरावून बसणारे आहे.
पद हे सद्उपयोगासाठी असते हे लक्षात घेतले तर आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी लहानश्या गोष्टींसाठी स्वत:ची पत घसरवू नये,असाच कायदा सांगतो आहे.
शासकीय गाड्यात पक्षाचे जनसंपर्क कार्यालय थाटने हा सरळसरळ पदाचा अतिदुरुपयोग आहे.याचबरोबर लोकसेवक पदाचा दुरुपयोग करतात म्हणून अधिकाऱ्यांनी आपले नैतिक व कायदेशीर कर्तव्य पार पाडू देऊ नये,ही त्याहून लाजिरवाणी बाब आहे.
आमदारांचे जनसंपर्क कार्यालय शासकीय गाड्यात असल्याने,न.प.चिमूर मुख्याधिकाऱ्यांनी योग्य कर्तव्याला व कायद्याला,अयोग्य गुणात्मक अहंकारात गुंडाळून ठेवले आहे?.
जे अधिकारी आपल्या पदातंर्गत कायदेशीर कर्तव्याला सत्ताधाऱ्यांचा दबावात गुंडाळून ठेवतात,त्यांना अधिकार आणि अधिकारी म्हणजे काय? हे मुळातच समजत नाही असे म्हणायचे काय? हे तरी अधिकाऱ्यांनी जनतेला सांगितले पाहिजे.
चिमूर न.प.च्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी प्रत्यक्ष भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात जावून शासकीय गाड्याची पहाणी केली पाहिजे आणि त्या गाड्याची इत्यंभूत माहिती घेतली पाहिजे व संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावली पाहिजे असेच जनमत आहे.
कायद्यापुढे सर्व प्रकारचे पदे थिटे आहे आणि पादाच्या दुरुपयोगात प्रतिष्ठा शुन्य आहे हे लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना केव्हा कळेल? हेच कळायला मार्ग नाही..
आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचे चिमूर येथील जनसंपर्क कार्यालय हे चिमूर नगरपरिषद अंतर्गत शासकीय गाड्यात असल्याने मुख्याधिकारी यांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे आणि आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी कायद्यानुसार भुमिका पार पाडली पाहिजे,अशी अपेक्षा जनता ठेवणारच!


