नगरपंचायत अहेरी अंतर्गत येणाऱ्या भुजंगरापेठा येथिल काटले व मडगेम परिवाराला जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत..!! — वादळ-वाऱ्यानी घरावरील उडाले छत..!!

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

      अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या भुजंगरापेठा येथे 13 एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी जोरदार वादळ-वारा सुटला होता त्या वादळवाऱ्यात श्री.यशोदा शंकर काटले व यशोदा शंकर मडगेम यांच्या घरावरील टीनचे छत संपूर्ण उडाले असून संसार उघड्यावर आला होता सदर बाब जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच आपल्या कार्यकर्तांना सांगून त्यांना बोलावन्यात आले तसेच प्रशासनाकडून आताचे आता नुकसान भरपाई मिळत नाही.त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली.असून प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत कुटुंबाला दिर दिले..!!

         यावेळी उपस्थित श्री.श्रीनिवास पेंदाम सरपंच कमलापूर,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,राजू दुर्गे सदस्य महागाव,वंदना दुर्गे सदस्य महागाव,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.