प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुकातंर्गत मौजा कन्हाळगाव (ब्राम्हण) परिसरातून एककेएस कंपनी द्वारे मुरुमाचे अवैध उत्खनन काल सायंकाळ पर्यंत सुरू होते.
दखल न्यूज भारत ने अवैध मुरुम उत्खननावर कायदेशीर बातमी प्रकाशित करताच,अवैध मुरुम उत्खनन स्थळावरुन MKS कंपनीच्या व्यवस्थापकासह कामगारांनी जेसीबी,हायवा वाहन व इतर आवश्यक साहित्य घेऊन पोबारा केलाय.
परंतु MKS कंपनीने चोरीच्या उद्देशाने केलेले मुरुमाचे अवैध उत्खनन हे महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडविणारे असणारे असून गंभीर गुन्ह्यांमध्ये मोडणारे आहे.
यामुळे चिमूर तालुका तहसीलदार यांनी मौजा कन्हाळगाव (ब्राम्हण) येथील मुरुम खोदकाम स्थळावर जावून अवैध मुरुम उत्खननाचे मोजमाप केले पाहिजे आणि MKS कंपनीच्या संचालकांवर योग्य दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि आवश्यक ते फौजदारी कारवाई केली पाहिजे.
अवैध उत्खनना अंतर्गत बुडणारा महसूल हा चिमूर तालुक्यातील नागरिकांचे अहित करणारा असल्याने MKS कंपनीच्या संचालकांना मोकाट सोडून जमणार नाही.
एमकेएस कंपनीच्या संचालकांनी मुरुमाचे हजारो ब्रास अवैध उत्खनन केल्याने,ते अवैध उत्खनन चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या खिशावर अवैध मार्गाने मारलेला डल्ला होय,हे तहसीलदार श्रिधर राजमाने समजून घेतील असा जनतेला विश्वास आहे.



