रामदास ठुसे…
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रशासनचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या सर्व विभागातील लिपिक सवर्ग च्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे व पदोन्नती स्तर कमी करून पदनाम बदल व जुनी पेन्शन लागू करणे या संदर्भात राज्यभर आंदोलन सुरु झाले असून चिमूर पंचायत समिती मध्ये दिनांक १६ फेब्रुवारी पासून असहकार काम बंद आंदोलन सुरु झालेले आहे.
मागण्यासंबंधाने दिनांक १७ फेब्रुवारी ला आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना निवेदन दिलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सेवेत येणाऱ्या सर्व विभागातील लिपिक वर्ग हा शासन प्रशासनचा मुख्य आधार स्तंभ आहे.लिपिक वर्गातील चौथ्या वेतन आयोगापासून वेतनत्रुटी अध्यापही सुधारित करण्यात आलेली नाही.
पदोन्नतीचे स्तर कमी करणे,जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात जय महाराष्ट्र शासकीय-निमशासकीय, अधिकारी-कर्मचारी संघटना शासनास पत्रव्यवहार करीत आहे.परंतु त्या कडे दुर्लक्ष होत आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी पासून असहकार काम बंद आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे.शासनाने लक्ष न दिल्यास २३ फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन सुरु करणार असल्याचे सांगितले.
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना निवेदन दिले असता कार्यालय प्रमुख अरुण लोहकरे यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी निवेदन देत असतांना संघटनेचे अध्यक्ष उमेश हिवरे,ओंकार ठेंगणे,विलास नन्नावरे,अनिकेत कन्नाके,सोनाली धोटे,अनिता मसारकर,वनिता मेश्राम,अल्का गिलबीले,सारिका नींदेकर,चेतना आस्कर,नितीन गभणे,सादिक खान,प्रशांत देहारकर,गिरीष वेटे,देवानंद भेले,संतोष टेभेकर,सुनील गिरडे,मदन किटे,विजय पडोळे उपस्थित होते.



