आरमोरी येथे शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा तालुका मेळावा संपन्न….. — आपल्या हक्कासाठी लढा तीव्र करा :- कॉ. डॉ. कोपुलवार 

प्रितम जनबंधु

   संपादक 

       आरमोरी :- गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत अगदी 1500 रु तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व प्रायव्हेट शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी प्रचंड वाढलेल्या महागाईत जगावे कसे? असा एक्ष प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. संघटनेच्या अथक संघर्षातून 9 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णय नुसार शापोआ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एप्रिल महिन्या पासून 1000 रू.मासिक वाढ केलेली आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने शापोआ कर्मचारी सरकार प्रती तीव्र नाराजी व्यक्त करत. कुटुंब चालण्यायोग्य मानधन वाढ व किमान वेतन लागू करण्यात यावे.

         यासह इतरही मागण्यासाठी पुढील रणनीती आखण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. डॉ. महेश कोपुलवार यांच्या मार्गदर्शनात तर आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक ड्रा बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 15 ऑक्टोंबर 2023 रोजी तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला.

           यावेळी ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष कुंदा कोहपरे, जयघोष दिघोरे, आरमोरी अध्यक्ष वर्षा गुंफलवार, सचिव रुपाली हेडॉऊ, कॉ.प्रकाश खोब्रागडे, मंजुषा रोहनकर, अमोल दामले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

      सदर मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना किमान 26 हजार रु. वेतन देण्यात यावे, चपराशी या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, दर महिन्याला मानधन व इंधन बिल देण्यात यावे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये, त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये, सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी, सर्व शाळेत ग्यास सिलेंडर, धान्यादि माल व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे, दरवर्षी करारनामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी, दिवाळी बोनस(भाऊबीज) लागू करण्यात यावी. शापोआ कर्मचाऱ्यांना शाळा व शाळेचा संपूर्ण पटांगण झाडन्यास सांगू नये. दर 3 महिन्यातून जिल्हास्तरावर संघटने सोबत बैठक आयोजित करून स्थानिक समस्यांचा निपटारा करण्यात यावा यासह विविध मागण्या विषयी चर्चा करण्यात आली.

               येत्या दिवाळी पर्यंत मानधन वाढीचा निर्णय न झाल्यास हिवाळी अधिवेशनात राज्यव्यापी तीव्र लढा करणार असल्याचा इशारा कॉ विनोद झोडगे यांनी दिला आहे. तर संघटनेचे 2 रे राज्य अधिवेशन 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी मोठ्या थाटामाटात सातारा जिल्ह्यत होणार असल्याचे माहिती कॉ. डॉ. महेश कोपुलवार यांनी दिली व आपल्या हक्कासाठी लढा तीव्र करा असे आवाहन केले आहे. मेळाव्यात तालुक्यातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

           सदर कार्यक्रमाचे संचालन कॉ.जयघोष दिघोरे, प्रास्ताविक कुंदा कोहपरे व आभार रुपाली हेडाऊ यांनी मानले.