भव्य कलश, कावड शोभायात्रेने नवदुर्गा महोत्सवा ची पिपरी-कन्हान येथे शुभारंभ…  — “जय माता दी”, “नवदुर्गा माता की जय” च्या जयघोषात कन्हान नगरी दुमदुमली…

कमलसिंह यादव 

 प्रतिनिधी

कन्हान : – सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे नवदुर्गा महोत्सवाचे आयोजन करून जय्यत नियोजनात पावन कन्हान नदीच्या पात्रातुन पुजा अर्चनासह जल घेऊन कलशधारी कन्या, महिला ल कावडधारी भाविकांच्या रांगेत नऊ रथासह भजन मंडळी, ढोल, ताशे व डिजेच्या मधुर सुरात ” जय माता दी”, ” नवदुर्गा माता की जय ” च्या जयघोषात भव्य कलश, कावड शोभायात्रा नवदुर्गा मंदीर पिपरी-कन्हा न येथे पोहचुन भक्तीमय धार्मिक वातावरणात नवदुर्गा माता महोत्सवाची सुरूवात करण्यात आली.     

       सार्वजनिक नव दुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे ६५ व्या वर्षी सुध्दा जय्यत तयारी व नियोजनात रविवार (दि.१५) ऑक्टोंबर २०२३ला सकाळी १०वा. कन्हान नदी पात्रातील पावन जल पुजा अर्चना करून कलश मध्ये भरून कन्या, महिला डोक्यावर १२१ कल श व भाविकांनी ३१ कावड खांदयावर घेऊन नवदुर्गेचे नऊ रथ, भजन मंडळी, ढोल, ताशे व डिजेच्या मधुर सुरात ” जय माता दी”, ” नवदुर्गा माता की जय ” च्या जयघोषात भव्य कलश, कावड यात्रा बीकेसीपी शाळे पासुन काढुन कन्हान मुख्य राष्ट्रीय महामार्गाने गांधी चौक, बस स्टाप, प्राथमिक आरोग्य केद्र चौक, डॉ आंबेडकर चौक आणि तेथुन पिपरी रोड ने अशोक नगर, शिवाजी नगर, धरमनगर ते नवदुर्गा मंदीर पिपरी ला पोहचुन देवीचे दुध, जल अभिषेक, पुजा अर्चना व घटस्थापना करून आरती सह नवदुर्गा महोत्सवाची थाटात शुभारंभ करण्यात आला. 

            राष्ट्रीय महामार्गा वरील पोलीस स्टेशन जवळ शिवसेना माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयांनी फुलांचा वर्षाव करून भव्य कलश, कावड शोभायात्रे ची सुरूवात करण्यात आली. जागो जागी फुलांचा वर्षाव, पाणी, फ़ळ वितरण करून भाविकांनी यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.

       अशोक नगर, शिवाजी नगर, धरम नगर, संभाजी चौक पिपरी आणि नवदुर्गा पिपरी चौकात महिलांनी कलशधारी कन्या, महिला व कावडधारी पुरूष भाविक भक्तांचे पाय धुवुन अक्षदा लावुन फुलांच्या वर्षावात पुजन करित नमन करून भावनिक स्वागत केले.

         याप्रसंगी सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी- कन्हानचे मार्गदर्शक प्रकाश भाऊ जाधव, नानकराम मोटवाणी, राधेश्याम भोयर, वासु सेठ झमतांनी, अजय भोस्कर, कार्यकारी अध्यक्ष देवा चतुर, उपाध्यक्ष अमोल सुटे, शितल भिमनवार, सचिव फजित खंगारे, कैलाश पवार, कोषाध्यक्ष प्रमोद मोटवानी, बाला खंगारे, सहकोषाध्यक्ष मनोज कुरडकर, प्रशांत मसार, अशोक मेश्राम, शरद डोणेकर, दिलीप राईकवार, भुषण निंबाळकर, गोविंद जुनघरे, राजेंद्र शेंदरे, राजेश यादव, मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, ऋृषभ बावनकर, सचिन साळवी, निलकंठ कुरडकर, मुरलीधर नानौटे ,आशिष वानखेडे, अजय लोंढे, प्रदीप बावने, सेवकराम बिलोणे, केसरी खंगारे, प्रभाकर बाव ने, हबीब शेख, बंटी हेटे, अंबादास खांदारे, गणेश खांडे कर, उपासराव खोब्पागडे, विशाल बरबटे, कैलास खंडार, समिर मेश्राम, रूपेश सातपुते, गौरव भोयर, गणेश मस्के, निशांत जाधव, संजय चतुर, विजय खड से, हरिदास ठाकरे, अजाबराव अनायके, कार्तिक कुथे, गंगाधर तिवाडे, सोनु कुरडकर, दिपक ताजने, प्रताप तिल्लीखेडे, शुभम येलमुले, गणेश रामापुरे, कुणाल येलमुले, हरिष खंगारे, हर्षल तिवाडे, सचिन खंगारे, सचिन फुलझले, रवी अडबोले, सुनिल चापले, बबन खडसे, रोहित बोरिले, रोशन खंगारे, बंटी ढोले, राधाबाई भोयर, दुर्गा कोरवते, कमला कुरडकर, गिता खंगारे, ज्योती येलमुले, कल्पना खंगारे, रोशनी खंगारे, मिनल कोरवते, स्नेहा वानखेडे सह मोठया संख्येने भाविक महिला, पुरूष उपस्थित होते. 

       दररोज नऊ दिवस महाआरती सकाळी ८ वाजता व सायंकाळी ७ वाजता आणि धार्मिक व विविध कार्य क्रम वेळेवर सुचित करण्यात येईल. रविवार (दि.२२) ऑक्टों. ला सायं. ४ वाजता अष्टमी महायज्ञ, २१ हवन कुंड पुजन, सोमवार (दि.२३) सायंकाळी ६ वा. पासुन भव्य महाप्रसाद, मंगळवार (दि.२४) ला सकाळी ९ वा .घटविसर्जन, सायंकाळी ७ वाजता रावण दहन करून नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येईल.

       नवदुर्गा महोत्सवाच्या यशस्विते करिता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हानचे सर्व पदाधिकारी, सदस्य वृंद व समस्त ग्रामस्थ नागरिक अथक परिश्रम घेत आहे.