Home Maharashtra गोंड गोवारी समाजाला आदीवासींत सामावुन घ्या!.. — नागपुरच्या संविधान चौकात १८...

गोंड गोवारी समाजाला आदीवासींत सामावुन घ्या!.. — नागपुरच्या संविधान चौकात १८ ला धरणे देणार :- विनायक वाघाडे…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

  देसाईगंज :- विदर्भात गोंडगोवारी ही जमात आदीवासी समाजाचीच उपजमात असुन शासनाने १९८५ च्या शासन निर्णयात या समाजावर अन्याय करुन त्यांना आदीवासीतुन विभक्त करुन त्यांना ओबीसीतुन एसबीसी चे उपवर्गीकरण करण्यात आले.

          शासनाने गोंडगोवारींचे अधिकार बहाल करुन या समुदायाला आदीवासीत समावून घेण्याच्या मागणीसाठी येत्या १८ तारखेला नागपुरच्या संविधान चौकात धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गोंडगोवारी हक्क संघर्ष कृती समिती चे जिल्हा अध्यक्ष विनायक वाघाडे यांनी केले आहे.                                       

      देसाईगंज येथिल पञकार परिषदेत माहिती देतांना विनायक वाघाडे म्हणाले की, गोंडगोवारी ही जमात विदर्भात मोठ्या संख्येने असुन १९५६ च्या काकासाहेब कालेलकर यांच्या अहवाला नुसार ही जमात आदीवासी समुदायाची उपजमात आहे, असे स्पष्ट नमुद करण्यात आले.

         माञ काही आदीवासी संघटनांनी आक्षेप घेतल्याने १९८५ ला या जमाती सोबत अन्याय करुन सदर जमाती ला ओबीसी समुदायात उपवर्गीकरण करुन एसबीसी असे उल्लेखित करुन आदीवासींतुन वगळण्यात आले. तेव्हापासुन या समाजावर शासन अन्याय करत असुन अनेक आंदोलने करुनही यावर पुर्ण:ता दुर्लक्ष करत आहे.

       यापुर्वी ही आंदोलनात ११४ गोवारी शहीद झाले असुन आता अधिकाराच्या लढाईसाठी गोंडगोवारी समाज पुर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरुन आंदोलन उभारत आहे. येत्या १८ तारखेला नागपुरच्या संविधान चौकात विदर्भातिल सर्व गोवारी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आदिवासी गोंडगोवारी जमात संघर्ष कृती समीती जिल्हा गडचिरोली च्या वतिने करण्यात करण्यात आले.

       यावेळी पत्रपरिषदेत जिल्हा अध्यक्ष विनायक वाघाडे, कवडू सहारे, मारोती राऊत, मोरेश्वर दुधकुंवर, रामु सेंदरे, संजय सहारे, मुकेश नेवारे, गोपाळा राऊत यांचेसह गोवारी बांधव उपस्थित होते.