युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानसोबत 14 सप्टेंबर ला क्रिकेटचा सामना खेळून आमच्या भगिनीच्या सिंदूराचा अपमान करण्याचे काम केंद्र सरकारने केले.याचा तीव्र निषेध करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार, सहसंपर्क प्रमुख प्रतिभाताई बोपशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.14 सप्टेंबरला शिवसेना महिला आघाडीच्या अमरावती जिल्हाप्रमुख सौ.अलका निलेश पारडे, उपजिल्हाप्रमुख वर्षा भोंडे, संगिता तुरखेडे, तालुका प्रमुख अंजनगाव यांच्या नेतृत्वाखाली, अंकुश पाटील कावडकर युवासेना जिल्हाप्रमुख अमरावती, प्रदीप वडतकर जिल्हा समन्वयक, बबनराव विल्हेकर विधानसभा संघटक, शिवसेना शहर प्रमुख गोपाल अग्रवाल, उपशहर प्रमुख दीपक बगाडे,रुपेश मोरे युवासेना शहर प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, दर्यापूर येथे तीव्र निदर्शने, आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
दर्यापूर येथिल महीला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध करीत दर्यापूर तालुक्यातील सिंदूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवायचा असल्याने बॉक्स मध्ये जमा करीत माझं कुंकू – माझा देश, केंद्र सरकारचा निषेध केला.
त्यावेळी दर्यापूर येथे महिला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असल्याने अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठे व यशस्वी आंदोलन झाले. त्या आंदोलन वेळी महिला आघाडी अमरावती जिल्हाप्रमुख सौ अलका निलेश पारडे, उपजिल्हाप्रमुख वर्षाताई भोंडे, तालुका प्रमुख अंजनगाव संगीताताई तूरखेडे, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर, विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, शिवसेना शहर प्रमुख गोपाल अग्रवाल,युवासेना शहर प्रमुख रुपेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य येवदा भावनाताई सोळंके,पूजा रामावत,उपशहर प्रमुख सुनीता मांडवे,संगीता चवळे,संगीता बनारसे, पद्मा खरपकर, ज्ञानेश्वरी वानखडे, रिया अग्रवाल,भावना शेंडोकर, रत्ना माटे,किरण आसोले,वैशाली नेरकर,पल्लवी बोंद्रे,पुष्पा गाढवे,रेखा पराये, सिंधू बगाडे,रेखा धुमाळे,सुनंदा खांदे,सुनीता शर्मा,चंदा जुनघरे, अश्विनी कळसकर, छाया कळसकर,शालिनी कळसकर,विद्या बयस,संजीवनी निमावत, प्रतिभा कावने, मीरा चुटे,सविता बयस, चंदा फुनघसे, सुमन सोनाळेकर,सुलोचना दावेदार, रश्मी मालवे, प्रमिला मालवे, दुर्गा सोळंके, वंशिका सोळंके, रुखमा गायगोले, तुळसाबाई सोळंके,सुरेखा थोटे, प्रेमादेवी रामावत,पद्मा कडू,तनिषा शर्मा,मनिषा कडू,शालू कळसकर, इत्यादी महिला व योगेश कावडकर,सतीश बनारसे, शुभम पारडे,पेंटर सावळे,उपस्थित होते.



