Home Maharashtra सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, तहसिलदारांना निवेदन…

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, तहसिलदारांना निवेदन…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

         गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे दर्यापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शासनाकडे तहसिलदार यांच्या मार्फत करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन दर्यापूर तहसिलदार यांना दि 15 सप्टेंबरला देण्यात आले.

          दि.13 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दर्यापूर सामदा, सासन, नांदरून, पाथरविरा, रामागड, करतखेडा, रामतीर्थ, लासूर, टोंगलाबाद, म्हैसपूर, धामोडी, शिवर, हिंगणी, पिंपळोद, जैनपूर, सुकळी, भामोद, लोतवाडा या गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर काही शेतकऱ्यांची नाल्यालगतची शेतजमिन अक्षरशः खरडून गेली आहे.

        शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली या गंभिर परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापासून त्यांना परावृत्त करता येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

         दर्यापूर विधानसभा समन्वयकवयक पंकज पाटील राणे, दर्यापूर शहर प्रमुख गोपाल अग्रवाल, खंडू पाटील राऊत यांच्यासह विशाल बगाडे, रोशन पाचपोहे, भैयाभाऊ ठाकरे, रोशन अमोदे, हेमंत दहातोंडे, संजय बगाडे, भूषण बुध, गजानन गावंडे, संकेत खेडकर, वेदांत शेळके, निलेश तायडे, अर्पित जळमकर आणि शेतकरी उपस्थित होते.