Home उपक्रम छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय,आसेगाव पूर्णा येथे स्वच्छता ही सेवा अभियान संपन्न…

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय,आसेगाव पूर्णा येथे स्वच्छता ही सेवा अभियान संपन्न…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक 

        छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा राष्ट्रीय सेवा योजना पथका द्वारे दि.13 ऑगस्ट रोजी स्वच्छता ही सेवाभाव स्वच्छ संस्कार स्वच्छता भारत तसेच दै. तरुण भारताचे शताब्दी वर्ष तसेच श्री.नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रासेयो पथकाच्या वतीने स्वच्छता व पर्यावरण पूरक कार्यक्रम राबविण्यात आला.

         12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.रविंद्र इचे यांनी याप्रसंगी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाची जाणीव निर्माण व्हावी या उदात्त हेतूने स्वच्छता ठेवण्यात आली पाहिजे असे प्रतिपादन केले.

        महाविद्यालयातील आजूबाजूचा परिसर,महाविद्यालयात येताना जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूची स्वच्छता करण्यात आली,महाविद्यालयामध्ये स्वच्छता करण्यात आली,हिवरा पूर्णा,टाकरखेड पूर्णा,आसेगाव पूर्णा आठवडी बाजार, विरस्तंभ यांची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली.

         रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम कसे होत आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले.

        स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये महाविद्यालयातील डॉ.भारत कल्याणकर, डॉ. हरिष काळे, डॉ. प्रविण सदार, प्रा.विपीन लिल्हारे,डॉ. सुवर्णा जवंजाळ, सौ. मुक्ता निबोरकर, विष्णुपंत घोम, दिनेश वाटाने,जयश्री खंडारे, संजय सोळंके, अविनाश कडू रासेयो स्वयंसेवक व विध्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.