नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा.

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली:नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथे स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 

     स्वातंत्र्याच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने ध्वजस्तंभाचे पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य के.एस. डोये यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. हेमकृष्णजी कापगते (माजी आमदार साकोली) तसेच प्रमुख अतिथी डी.डी. कोसलकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) पि.आर. गोमासे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) गजापुरे सर (सेवानिवृत्त शिक्षक) नाकाडे सर (सेवानिवृत्त शिक्षक) काशीवार सर (सेवानिवृत्त शिक्षक) एस. एच. कापगते सर (सेवानिवृत्त शिक्षक) इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

         कार्यक्रमाप्रसंगी आर. एस. पी. च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथचलनाचे प्रदर्शन करून प्रमुख अतिथींना मानवंदना देऊन प्रेक्षकांची मने जिंकली तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत भाषणे नृत्य इत्यादी उत्कृष्टरित्या कार्यक्रम सादर केले. 

         प्राचार्य के. एस. डोये यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले , देशाचे स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मिळालेले स्वातंत्र्य होय.आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, लोकसंख्या वाढ, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध प्रकारची रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने आटोक्याने प्रयत्न केले पाहिजे. मी देशासाठी काहीतरी देऊ शकतो याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. देशभक्ती, राष्ट्रगीत प्रत्येक भारतीयांनी प्राणपणाने जोपासण्याची गरज असली पाहिजे असे मार्मिक विचार आपले अध्यक्ष भाषणातून प्राचार्य के.एस.डोये यांनी व्यक्त केले. 

    कार्यक्रमाचे संचालन के. जी. लोथे यांनी तर आभार प्रदर्शन आर.बी. कापगते यांनी केले. सरतेशेवटी कार्यक्रमाचे समारोप प्रसाद वाटप करून वंदे मातरम या गीताने करण्यात आले.